सिकंदर टोळीचे दोन गुर्गे अजूनही मोकाट, ‘त्या’ जुगाऱ्यांना पोलिसांचे अभय आहे का?

Foto

औरंगाबाद - वाळूज महानगर परिसरात गुंडाच्या टोळी कडून सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचे स्टिंग ऑपरेशन करुन सांजवार्ता ऑनलाईनने अवैध धंदे समोर आणले होते. त्यानंतर दोन तासांत सर्व अड्डे बंद झाले होते. मात्र व्हिडिओमध्ये दिसत असलेले सिकंदर टोळीचे दोन गुर्गे अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे या टोळीला पोलिसांचे आशीर्वाद आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

विना हेल्मेट चालकांवर कारवाई आणि गुंड मोकाट

चक्री जुगाराची बातमी सांजवार्ताने प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व अड्डे उद्ध्वस्त करुन गुंडांच्या टोळीच्या मुसक्या आवळणे गरजचे होते. मात्र पोलिसांनी आम्ही मारल्या सारखे करतो आणि तुम्ही रडल्या सारखे करा अशी कारवाई केल्याचे आता बोलले जात आहे. जुगाराचे अड्डे तेवढे बंद असून गुंड मात्र मोकाट आहेत. यावर नागरिकांनी म्हटले आहे, की एखादा विना हेल्मेट दुचाकी चालविताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला तर त्याचे घर शोधून पोलिसांकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र अवैध धंद्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुंडांना अटक केलेली नाही. यामुळे गुंडांसोबत पोलिसाचे साटेलोटे आहेत का, काही आर्थिक लागेबांधे आहेत का, अशी चर्चा वाळूजमध्ये सुरु आहे.

 

वाळूजमध्ये २० अड्डे

वाळूज महानगर परिसरात कामगारांचे संसार उद्ध्वस्त कारणाऱ्या चक्रीजुगाराचे २० पेक्षा जास्त अड्डे सुरू होते. या काळ्या धंद्याचे स्टिंग करून सांजवार्ता ते समोर आणले होते.  बातमी प्रकाशित होताच  काही तासांच्या आत वाळूज महानगर मधील सर्व जुगार अड्डे  बंद झाले होते.

सांजवार्ताच्या स्टिंगमध्ये जुगार चालविणाऱ्या गुंडाच्या टोळीतील दोन गुर्गे स्पष्टपणे दिसत आहेत. तरी देखील पोलिसांनी  त्या दोघांवार कुठलीही कारवाई  केलेली नाही. यामुळे पोलिस देखील जुगार चालकांना अभय देत आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मानत  निर्माण झाला आहे.